KL Rahul-Athiya Wedding : केएल राहुल- अथिया शेट्टी अडकले विवाह बंधनात

Photo of author

By Admin

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज विवाह बंधनात अडकले. केएल राहुल- अथिया या दोघांचा विवाह सोहळा ( KL Rahul-Athiya Wedding ) काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळीसोबत सातारा येथील खंडाळा फार्महाईसवर मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाहाला क्रीडा क्षेत्रातील आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.

याआधी खंडाळा येथे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनी कॅमेऱ्यासमोर येवून मुलांची लवकरच भेट घालणार असल्याची माहिती दिली होती. यावरून आज मंगळवारी (दि. २३) रोजी केएल राहुल- अथिया शेट्टी यांचा विवाह होणार असल्याची हिट मिळाली होती. नुकताच हा लग्न सोहळा ( KL Rahul-Athiya Wedding ) पार पडला आहे. सांयकाळी ७ वाजल्यानंतर या विवाह सोहळ्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळणार अशी आशा आहे.

केएल राहुल- अथिया यांचा विवाह पार पडल्यानंतर अथियाचे वडील सुनील शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टीने फार्महाऊसमधून बाहेर येवून लोकांना मिठाई वाटली आहे. या विवाहाला क्रिकेटपटू विराट कोहली, युवराज सिंह, जहीर खान, हरभजन सिंह, मंसूर अली खान पटौदी, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहसिन खान, क्रिकेटर इशांत शर्मा, अंशुला कपूर याच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले आहेत.

अथियाचा बेस्ट फ्रेंड कृष्णा श्रॉफ आणि अजय देवगण आणि संजय दत्त यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून कपलला भरभरून आशिर्वाद दिला आहे. यात कृष्णा श्रॉफने लग्नाची जोरदार तयारी असून लग्न पाडले आहे असे म्हटले आहे. अजय देवगणने ‘माझ्या प्रिय मित्रांचे अभिनंदन @सुनील शेट्टी, त्यांच्या मुलीसाठी @theathiyashetty चे लग्न आहे. या तरुण जोडप्याला आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो. आणि, या शुभ प्रसंगी तुमच्यासाठी एक खास होवो अशी आशा आहे.❤️ अजय.’ असे म्हटलं आहे.

तर संजय दत्तने ‘अण्णांचे खूप खूप अभिनंदन @सुनील शेट्टी. पाहण्यासाठी या गोड आणि आश्चर्यकारक घटनेचा मी साक्षीदार आहे @theathiyashetty सह गाठ बांधा @klrahul. या जोडप्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अप्रतिम प्रवासासाठी शुभेच्छा ❤️.’ असे लिहिले आहे. यावरून दोघांचा विवाह पार पडल्याचे माहिती मिळतेय. मात्र, या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ अध्याप सोशल मीडियावर व्हायरल झालेले नाहीत.

हेही वाचा : 

(video : manav.manglani instagram वरून साभार)

 

Leave a Comment