Actress Athiya Shetty- Cricketer KL Rahul Updates: अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्म हाऊसवर दोघांचं लग्न होणार आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून रविवारी दोघांचं संगीत होतं. या संगीत सोहळ्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये घरातील सदस्य व पाहुणे जोरदार डान्स करताना दिसत आहेत.