Athiya Shetty आणि KL Rahulच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात; मेहेंदी, संगीतपासून लग्न आणि गेस्टपर्यंत सर्व डिटेल्स आले समोर – Marathi News | Athiya Shetty and KL Rahul’s pre wedding function started; From mehendi, music to wedding and guests, all the details came forward

Photo of author

By Admin

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:57 PM2023-01-21T13:57:46+5:302023-01-21T14:01:09+5:30

Athiya Shetty – KL Rahul: अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा विवाह २३ जानेवारीला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स आजपासून सुरू झाले आहे.

सुनील शेट्टीची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुलचे प्री-वेडिंग फंक्शन्स आजपासून सुरू झाले आहेत.

२३ जानेवारीला हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

२३ जानेवारी रोजी, अथिया आणि केएल राहुल वधू-वरांच्या बाजूने केवळ १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधतील.

अथिया आणि केएल राहुलचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्याच्या आलिशान बंगल्यात होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मेहंदी सेरेमनी २२ जानेवारीला होणार आहे आणि हा सोहळा घराच्या आत होणार आहे आणि जास्त फंक्शन्स होणार नाहीत.

सर्व पाहुण्यांना फोटो पोस्ट न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचे फोन दूर ठेवले जात आहेत.

काही बॉलिवूड सेलिब्रिटीही लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, मात्र लग्नात फक्त कुटुंबातील सदस्यच सहभागी होणार आहेत.

झूम डिजिटल रिपोर्टनुसार, काही आठवड्यांनंतर मोठे रिसेप्शन ठेवले जाणार आहे.

अथिया आणि राहुलची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. लवकरच ते जवळचे मित्र बनले आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही.

दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अलीकडेच या जोडप्याने दुबईत एकत्र नवीन वर्ष साजरे केले. आता हे जोडपं लग्न करून नव्या नात्याला सुरुवात करणार आहे.

Leave a Comment