Rakhi Sawant Detained By Mumbai Police Accused Of Sharing Offensive Videos And Photos Of The Model

Photo of author

By Admin

Rakhi Sawant : मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) ताब्यात घेतलं आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.  

आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक ट्वीट शेअर केलं आहे. शर्लिन चोप्राच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

New Reels

वैयक्तिक आयुष्यामुळे राखी असते चर्चेत

राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असत. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.

बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rakhi Sawant : प्रेग्नन्सी अन् गर्भपाताच्या चर्चेवर अखेर राखीने सोडलं मौन; म्हणाली…

 

Leave a Comment