Rakhi Sawant: राखी सावंतच्या अटकेनंतर शर्लिन चोप्राने केली दिवाळी.. नेटकऱ्यांनी तिलाही दाखवली जागा..

Photo of author

By Admin

  1. Home
  2. manoranjan
  3. Sherlyn Chopra Happy To Shared News Of Rakhi Sawant Arrested Nsa95

By

Published on : 19 January 2023, 9:02 am

A+

A-

Sherlyn Chopra tweet : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. मुंबई पोलिसांनी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला अटक केली असून काही वेळाने अंबोली पोलीस सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.

(Sherlyn Chopra happy to shared news of rakhi sawant arrested)

मॉडेल शर्लिन चोप्राचा तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिने पत्रकार परिषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

नक्की हे प्रकरण काय आहे?

गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये राखीने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि अपशब्द वापरले होते.पण या प्रकरणात शर्लिन चोप्राने पण राखी सावंतवर खुप घाणेरडे आरोप केले होते ज्यामुळे राखी अडचणीत आली.

राखीने नंतर मीडियाला सांगितले की, “मला हे सांगताना खूप वाईट वाटते की तिने माझ्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे माझ्या आयुष्यात गोंधळ निर्माण झाला आहे. तिच्यामुळे माझ्या प्रियकराने मला विचारले आहे की शर्लिन जे काही बोलत आहे त्यात काही तथ्य आहे का? , माझे खरच 10 बॉयफ्रेंड आहेत का. तिने नुकतेच येऊन मीडियात वाटेल ते सांगितले आणि आता मला त्याची किंमत मोजावी लागतेय.”

पुढे दोघींनीही एकमेकांवर घाणेरडे आरोप केले. अगदी शर्लिन चोप्रा पॉर्न व्हीडिओत काम करते असेही आरोप राखीने केले. याच दरम्यान राखीने शर्लिन च्या काही व्हिडिओ लोकांना दाखवल्या. तिचे फोटो व्हायरल केले. त्यावेळी शर्लिनने राखी विरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यावर अखेर आज कारवाई झाली आहे.

हेही वाचा: Ameya Khopkar: असा चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही! अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले..

आता राखी सावंतला अटक केल्या बद्दल शर्लिन चोप्रा ‌‌खुश आहे, तिनेच ही बातमी ट्विट करत मीडियाला दिली. पण आता राखीच्या चाहत्यांनी शर्लिन चोप्रावर निशाणा साधला आहे “शर्लिन चोप्रा आधी तु स्वतः काय आहे ते बघ “, ” जेव्हा तु स्वतःचे अश्लील व्हिडिओ पब्लिश करते तेव्हा चालतं का? “, ” तू का तिच्या मागे लागली आहेस बिचारी राखी “, ” राज कुंद्रा बरोबर बोलला होता समाजाला धोका आहे तुझ्या मुळे ” अशा शब्दात शर्लिन चोप्रावर नेटकरी टीका करत आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

ओके

Leave a Comment